Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून बेड्या ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, कोतवाली पोलिसांची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 11 October 2023, 16:01

Nagar News : कोतवाली, (नगर) : शहरातील मध्यभागी असलेल्या सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स दुकान फोडून रेल्वेने प्रवास करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह नाशिक येथून जेरबंद केले आहे.

३ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय – २२, रा. वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय – २३, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा सिकलकर वस्ती) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ०१) सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेह्ला होता. याप्रकरणी संतोष सिताराम सहदेव ऊर्फ वर्मा (वय ५७, रा. गुंजाळ हॉस्पिटल, माणिक नगर ता. जि. अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर आरोपींच्या शोधासाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. सराफा बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी आरोपींनी नाशिक मधून मारुती इको कार चोरली होती. चोरीच्या कारमधून नगरमध्ये येऊन सराफा बाजारातील दुकान फोडले होते. कोतवाली पोलिसांना खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली की गुन्हा केलेले दोन आरोपी मुंबई कडे पळून जात आहेत. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असतानायेवल्या नजीक रस्त्याच्या कडेला चोरीची चारचाकी गाडी कोतवाली पोलिसांना आढळून आली. तो परिसर कोतवाली पोलिसांनी पिंजून काढला.

 

दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून रेल्वेची माहिती काढून दोघांना नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी इतर सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी अक्षयसिंग जुन्नी याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल..
सदर घटनेतील आरोपी अक्षयसिंग बिरूसिंग जुनी याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत १२ गुन्हे दाखल असून वानवडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. तसेच तो हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मोक्याचे गुन्ह्यात फरार आरोप आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला व त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, गजेंद्र इंगळे, अंमलदार तनविर शेख, गणेश धोत्रे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, अभय कदम, सोमनाथ राउत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सतिश शिंदे तसेच दक्षीण मोबाईल सेलचे राहुल गुंड यांच्या पथकाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19

पीएमआरडीएचे 9 कोटी रुपये गेले मातीत; उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्यावर 4 फूट मातीचा राडारोडा, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी..

Wednesday, 2 September 2026, 17:16

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

Wednesday, 2 September 2026, 16:46

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53
Next Post

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी येथील मुक्ताई मेमोरिअल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp