लोणी काळाभोर, ता. 20 : गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाला एकाकडे 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा ‘एमडी’ ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ सापडल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (Loni Kalbhor Crime), (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात बुधवारी (ता.19) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक करून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लोणी काळभोरमध्ये ड्रग्ज सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अफसर अहेसान अंन्सारी (वय 31, रा. पाषाणकर बाग, गैस एजन्सी शेजारी लोणी काळभोर, ता हवेली, जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन मारूती मुंढे (वय 38 ) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा: १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन करत प्रेमाच्या बहाण्याने केलं भयंकर कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पथकाला एक व्यक्ती लोणी काळभोर येथील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नाव विचारले असता. त्याने त्याचे नाव अफसर अहेसान अंन्सारी असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 लाख 80 हजार 920 रुपये किंमतीचे 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा ‘एमडी’ ड्रग्ज व 20 हजार किंमतीचा मोबाईल, लेक्ट्रीक वजनकाटा, पिशवी, चमचा, झिप-लॉक पादर्शक 17 रिकाम्या पाउच असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा: अजित पवारांच्या पक्षाकडून पत्नीला जाळणाऱ्या आरोपीला उमेदवारी; विरोधकांकडून आरोपाच्या फैरी
दरम्यान, पोलीस हवालदार नितीन मुंढे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अफसर अंन्सारी याच्यावर एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम 8 (क), 21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत.
हेही वाचा: मारहाण प्रकरणात नवा ट्वीस्ट! रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकरांना पाठवली 10 कोटींची नोटीस







