Buldhana news – राज्यात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही हाच प्रकार करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. चिखली नगरपरिषद निवडणुकीत हा प्रकार घडला आहे.

चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल उर्फ रिकी काकडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 9 नोव्हेंबरला पत्नी नमिता काकडे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतर तो कोठडीत आहे.
कोठडीतूनच उमेदवारी दाखल
काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानंतर विशाल काकडेनं राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाची परवानगी घेऊन, पोलीस संरक्षणात तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रभाग 13 अ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आला. Buldhana News
या प्रकारामुळे चिखली शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेला व्यक्ती थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरतोय, यावरून नागरिकांत आणि राजकीय वर्तुळात टीकांची झोड उठली आहे.







