Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या गटातील रिपाली ठोंबरे पाटील या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांच्याशी वाद झाला होता. आता याच वादाने पेट घेतला असून कायदेशीर पातळीवर पोहोचला आहे. रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil Notice) यांनी माधवी खंडाळकर यांनी केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत त्यांना 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे. (Maharashtra Politics)

नुकतीच माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील यांच्याविरोधात एक पोस्ट केली होती. त्या व्हिडिओत त्यांनी रुपाली पाटील यांची मारहाण केल्याचा दावा केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ चुकून पोस्ट झाल्याचे सांगितले. मात्र, काही वेळाने त्यांनी माध्यमांसमोर येऊन रुपाली ठोंबरे पाटील यांनी बळजबरीने माफीचा व्हिडीओ शूट करुन घेतल्याचा आरोप केला.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट केले की मारहाणीचा आरोप ज्या दिवशी करण्यात आला त्या दिवशी त्या बीड जिल्ह्यात होत्या, त्यामुळे हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी माधवी खंडाळकरांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या विधानांमुळे आपल्या प्रतिमेला मोठी हानी झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, माधवी खंडाळकर यांनी केलेला मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसत असून रुपाली पाटील यांनी गुंड पाठवले होते. गुंडांकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र नंतर काही तासांतच त्यांनी आपलेच विधान बदलल्याने गोंधळ निर्माण झाला.
या प्रकरणात सर्व राजकिय नेत्याचे लक्ष लागून आहे. रुपाली पाटील यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यांनी त्या बीडमध्ये असल्याचे सांगितले.






