पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील (Pune Crime) ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी (Junnar News) एका सात वर्षीय चिमुकलीवर (Pune News) अमानुष अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ऊसतोड मजूर कुटुंबातील असून, तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी हा देखील त्याच वस्तीतील शेजारीच असल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. (Breaking News)

आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे असून, तोही ऊसतोड कामगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी मुलगी घराबाहेर खेळत होती. याच वेळी आरोपी देवीदास गर्जे याने तिला जबरदस्तीने एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरून घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ओतूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक केली आहे. पीडित बालिकेवर तातडीने पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून, पोलीस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
या घटनेमुळे ऊसतोड कामगारांच्या वस्तीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. आरोपी देविदास गर्जे याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२)(एन) सह पॉक्सो कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या नराधमाला लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.






