Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती हद्दीत वाहनांच्या लांबच लांब रांगा; संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या प्रवासादरम्यान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 6 August 2026, 10:34

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू असतानाच, कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीत भीषण वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांचे अपुरे नियोजन आणि अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, तासनतास अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी पुरते मेटाकुटीला आले आहेत.

तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरून देहूच्या दिशेने परतीच्या प्रवासावर असताना, सोलापूर रस्त्यावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली. बुधवारी (ता. 05) कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मुक्कामी होती. आज गुरुवारी (ता. 06) पुण्याच्या दिशेने निघाली त्यामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

अनेक बस, जड वाहने, रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वार या कोंडीत तासनतास अडकून पडले. पडणारा रिमझिम पाउस आणि वाहतूक कोंडीमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि भाविकांचे हाल झाले.

पालखीच्या परतीच्या प्रवासाची पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाने योग्य पर्यायी मार्गांचे नियोजन केले नव्हते का? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून विचारला जात आहे. महामार्गावरील मुख्य चौकात आणि सेवा रस्त्यांवर अचानक वाहने समोरासमोर आल्याने कोंडीत अधिकच भर पडली. काही ठिकाणी वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु वाहनांची संख्या प्रचंड असल्याने आणि काही बेजबाबदार वाहनधारकांनी लेन तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.

 

“आम्ही गेल्या दीड ते दोन तासांपासून एकाच ठिकाणी अडकून पडलो आहोत. पालखीचा मार्ग माहीत असताना प्रशासनाने योग्य त्या वेळी वाहतूक डायव्हर्ट करायला हवी होती. महामार्गावर दरवर्षी पालखीच्या वेळी अशीच परिस्थिती निर्माण होते, तरीही प्रशासनाला कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.”

विवेक शिंदे, प्रवासी, पुणे

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पुलाला धोक्याची घंटा? पुलाखाली वाढलेली भलीमोठी झाडे, साचणारे पाणी आणि कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त

Friday, 7 August 2026, 13:14

MIT कॉर्नर येथील इमारतीच्या टेरेसच्या कड्यावर धोकादायकरीत्या बसून विद्यार्थिनींची ‘दम मारो दम’ पार्टी

Friday, 7 August 2026, 13:02

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवलेंची निवड

Friday, 7 August 2026, 12:18

रामदरा रस्त्यावर अवजड ट्रक पडला बंद ; शाळकरी विद्यार्थी, नोकरदारांसह नागरिकांचे प्रचंड हाल

Friday, 7 August 2026, 12:01

भरधाव कंटेनरचा कहर! सहजपूर फाट्याजवळ NHAI चा भलामोठा दिशादर्शक फलक कोसळला; दीड तास पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प

Friday, 7 August 2026, 11:48

इंदापुरात कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस, आरोपीवर पोक्सोसह गंभीर गुन्हे दाखल..

Friday, 7 August 2026, 11:30
Next Post

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 'कंचन वृंदावन' सोसायटीतील दोन घरमालकांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.