पुणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 अधिकृत प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या कोअर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.या प्रवक्त्यांच्या टीममध्ये जितेंद्र आव्हाड, अनिश गवांदे, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अॅड. फैजल मिर्झा, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाच्या विविध धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी पक्षातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष) ,जयंत पाटील (माजी मंत्री),अनिल देशमुख (माजी मंत्री),हर्षवर्धन पाटील (माजी मंत्री)राजेश टोपे (माजी मंत्री),जितेंद्र आव्हाड (आमदार) ,डॉ. अमोल कोल्हे (खासदार),निलेश लंके (खासदार) फौजियाताई खान (माजी खासदार),राजेंद्र शिंगणे ॲड. अशोकबापू पवार (माजी आमदार)

नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर पक्षाची आक्रमक व सुस्पष्ट भूमिका पोहोचवण्याची जबाबदारी या 10 सदस्यांच्या टीमकडे असणार आहे.








