Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या ‘कंचन वृंदावन’ सोसायटीतील दोन घरमालकांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 6 August 2026, 10:58

उरुळी कांचन, (पुणे) : भाडेकरूंची कोणतीही माहिती पोलिसांना न देता जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली करणाऱ्या दोन घरमालकांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ‘कंचन वृंदावन सोसायटी’ परिसरात दहशतवाद विरोधी पथक व उरुळी कांचन पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबात दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक महेश वसंत गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अतुल आनंद कुलकर्णी रा. मुक्ता रेसिडेन्सि, कोथरूड पुणे) व सुरेश कृष्णाजीराव नाझरे (रा. कंचन वृंदावन सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, कोणत्याही घरमालकाने आपली मालमत्ता किंवा घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची संपूर्ण माहिती, ओळखपत्रे आणि कराराची प्रत स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. परंतु अनेक घरमालक निष्काळजीपणापोटी भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देताच त्यांना राहण्यास जागा देतात.

पहिल्या घटनेत बुधवारी (ता. 05) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एटीएस पथकाने कोरेगाव मूळ येथील कंचन वृंदावन सोसायटीत तपासणी केली. त्यावेळी घरमालक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवला असल्याचे आढळले; मात्र त्याची कोणतीही नोंद उरुळी कांचन पोलीस ठाण्यात केली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

 

दुसऱ्या घटनेत सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याच सोसायटीतील बिल्डिंग ए-4, फ्लॅट क्र. 106 ची तपासणी करण्यात आली. तेथील घरमालक सुरेश कृष्णाजीराव नाझरे (रा. कंचन वृंदावन सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांनीही भाडेकरूची माहिती पोलिसांना न देता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवरहि बीएनएस कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस फौजदार सस्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56
Next Post

‘लग्न कर नाहीतर जीव घेईन’ म्हणत विवाहितेवर बलात्कार; उरुळी कांचन पोलिसांनी सोरतापवाडीतून आरोपीला केली अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp