Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 21:06

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कोल्हापूर जिल्ह्यात वेग आला आहे. आंबा ते शिये फाटा दरम्यानचे काम सध्या गतीने सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्च २०२७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, शिये फाटा ते सांगली या मार्गासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती तसेच भूसंपादनातील अडचणी सोडविण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाबाबत सध्या स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर ते रत्नागिरीदरम्यानचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. यामध्ये मिऱ्या बंदर ते आंबा, आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक या टप्प्यांचा समावेश आहे. मिऱ्या बंदर ते आंबा या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडी टप्प्यातील सुमारे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर पैजारवाडी ते चोकाक टप्प्यात सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

पैजारवाडी ते चोकाक टप्प्याचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आंबा ते शिये फाटा या भागातील उर्वरित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे घाटात धोकादायक वळणे आहेत. या वळणांना कायमस्वरूपी पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच आणि लांब उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी सध्या दिवसरात्र काम सुरू असून, ६०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.

 

कामासाठी १०० हून अधिक डंपर, ५० पोकलेन, १० मोठे जेसीबी आणि ५०० टनांपर्यंत वजन उचलण्याची क्षमता असणारे क्रेन तैनात करण्यात आले आहेत. अवघड घाट परिसरातील काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.

दरम्यान, आंबा ते शिये फाटा मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी शिये फाटा ते सांगली मार्गासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती आणि भूसंपादनाच्या अडचणी दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुढील कामाच्या वेळापत्रकाबाबत सध्या स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp