Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 21:52

मुंबई: नवरात्रोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना गुजरात, मुंबईसह देशभरात गरबा आयोजनाची तयारी सुरू आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर ‘Rent A Garba Partner’ म्हणजेच भाड्याने गरबा पार्टनर देण्याच्या आशयाचे पोस्टर्स आणि जाहिराती व्हायरल होत आहेत. या जाहिरातींमुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये चर्चेला उधाण आले असून, सायबर क्राईम विभागाकडून याबाबत चौकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या जाहिरातींमध्ये सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम अशा वेगवेगळ्या पॅकेजचा उल्लेख करण्यात आला आहे. सिल्व्हर पॅकेजसाठी १,५०० ते २,००० रुपये शुल्क असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामध्ये दोन तास गरबा खेळणे, मॅचिंग पोषाख, गरब्याच्या सोप्या स्टेप्स शिकवणे आणि सेल्फीचा समावेश असल्याचे जाहिरातींमध्ये नमूद आहे.

गोल्ड पॅकेजसाठी १,५०० ते ३,००० रुपये शुल्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पॅकेजमध्ये चार तास गरबा खेळणे, दोघे कसे भेटले याची खोटी स्टोरी सांगणे आणि सोशल मीडियासाठी रील्स किंवा व्हिडीओ तयार करणे यांचा समावेश असल्याचे जाहिरातींमध्ये म्हटले आहे.

प्लॅटिनम पॅकेजसाठी २,००० ते ६,५०० रुपये शुल्क असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये गरबा कार्यक्रमात पूर्णवेळ सहभाग, दुपट्टा आणि झुमके व्यवस्थित करण्यासाठी मदत, लेट नाईट फूड आउटिंग आणि घरी सुरक्षित पोहोचवण्याचा दावा करण्यात आला आहे.

 

दरम्यान, अहमदाबाद सायबर सेल आणि पोलिसांनी या जाहिरातींमध्ये तथ्य नसून त्या बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही पैशांच्या मागणीला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनीही या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून महिलांची फसवणूक, हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक फसवणूक करणारे सायबर रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, संबंधित सोशल मीडिया प्रोफाईल्सची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाड्याने पार्टनर घेण्याची संकल्पना चीनमधून आल्याचे या संदर्भातील माहितीत म्हटले आहे. चीनमध्ये विविध वेबसाइट्स, अॅप्स आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर भाड्याने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळण्याच्या जाहिराती केल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, भारतात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा जाहिराती व्हायरल झाल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सध्या मुंबई, अहमदाबाद आणि सुरत सायबर क्राईम पोलिसांकडून या जाहिरातींच्या मागील व्यक्तींचा शोध घेतला जात असून, नागरिकांना सोशल मीडियावरील अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp