उरुळी कांचन : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात. यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. 12) रूट मार्च काढण्यात आला.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडीसह आदी भागातून हा रूट मार्च काढण्यात आला. उद्या होणाऱ्या मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील 10 पोलीस अंमलदार, यवत पोलीस ठाण्यातील अंमलदार, कर्नाटक सीआरपीएफचे 21 जवान हजर होते.