उरुळी कांचन, (पुणे) : बालब्रह्मचारी परमपूज्य जिवराज महाराज यांची जन्मभूमी नायगाव आहे. त्यामुळे गुरूंची जन्मभूमी विकसित करण्यासाठी आम्ही गाव दत्तक घेतले असून गावच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांनी दिले.
नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने 2 कोटी 75 लाख रुपयांच्या ग्रामपंचायत कार्यालय व सार्वजनिक सभागृह भूमिपूजन समारंभ व विविध शासकीय योजनांमधून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन शुक्रवारी (ता. 27) शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ओमप्रकाश पोकर्णा बोलत होते.
यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संदीप गोते, नायगाव पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, बाळासाहेब धोका, कृष्णआप्पा चौधरी, यशवंतचे संचालक विजय चौधरी, शांताबाई पोकरणा, विपिन कुमार कोचेटा, प्रवीण नहार, ईश्वर कांकरिया, सुजित बलदोटा, सरपंच अश्विनी चौधरी, उपसरपंच दत्तात्रय बारवकर, सदस्य गणेश चौधरी, जितेंद्र चौधरी, कल्याणी हगवणे, उत्तम शेलार, बाळासाहेब गायकवाड, संगीता शेलार, पल्लवी गायकवाड, प्रियंका गायकवाड ,आरती चौधरी ग्रामसेविका विजया भगत, विठ्ठल चौधरी, पोपट चौधरी, विजय चौधरी, कैलास चौधरी, गुलाब चौधरी, अर्जुन चौधरी, दत्तात्रय चौधरी, नितीन हगवणे, योगेश चौधरी, नवनाथ गायकवाड, सुरेश हगवणे, बापू चौधरी, चंद्रकांत चौधरी, शिवाजी चौधरी, सुनील हगवणे, भाऊसाहेब चौधरी, विकास चौधरी, गणेश चौधरी, माया चौधरी, दिलीप पानसरे, संतोष बोधे, पांडुरंग काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले, “ग्रामपंचायत कार्यालय व त्यापुढे सार्वजनिक सभागृह याचे चांगल्या आर्किटेक्चर कडून प्लॅन करून काम करावे. अपुरा पडणाऱ्या निधीसाठी मी व पोकर्णा साहेब दोघेही प्रयत्न करू. गावच्या ट्रान्सफॉर्मर, दवाखाना, तसेच वैयक्तिक शासकीय अडचणी व सर्व ग्रामस्थांच्या आलेल्या समस्या सोडवण्यासाठी आज पर्यंत प्रयत्न केले असून राजेंद्र चौधरी व ग्रामपंचायत सर्वच पदाधिकाऱ्यांचा कामांसाठी सतत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा असतो . भविष्यात देखील सर्व विकास कामांसाठी माझा तुम्हाला पाठींबा राहील.
दरम्यान, गुरूंच्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी आमदार पोकरणा यांनी जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे 300 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप दोन महिन्यापूर्वी केले होते. महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून सार्वजनिक सभागृहासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र पवार यांनी केले व सभागृहास परमपूज्य जीवराज महाराज यांचे नामकरण करण्यात येणार असल्याचे सांगून आभार माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी मानले.