Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात सर्वत्र जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार? गटविकास अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश…

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 5 October 2025, 13:06
Jal Jeevan Mission Yojana Corruption: Irregularities and corruption in the work of Jal Jeevan Mission everywhere in Shirur taluka? Group development officers have ordered an inquiry...

Photo-Social Media

न्हावरे: शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता (Jal jeevan Mission Yojana Corruption)  होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना संबंधित योजनेच्या कामांची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गटविकास अधिकारी महेश डोके यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या लेखी आदेशानुसार, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांकडून कामाच्या गुणवत्तेचा अभाव, चुकीच्या ठिकाणी विहिरी खोदणे, पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकताना ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची विनापरवाना खोदाई करणे तसेच नियमबाह्य पद्धतीने पाइपलाइन टाकणे अशा प्रकारच्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात ‘पुणे प्राईम न्यूज’ने जलजीवन मिशनच्या निकृष्ट आणि चुकीच्या कामांविषयी वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी 25 सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डोके यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे प्रकार आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीनंतर पंचायत समितीने पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच अभियंता (योजना) यांना चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे.

 

दरम्यान, जलजीवन मिशन योजनेच्या कामांसंदर्भात गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीच्या मर्यादेत चालणाऱ्या कोणत्याही योजनेत नियमभंग अथवा त्रुटी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19
Next Post

Ravindra Dhangekar : “ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार फिरतात, त्यांनी उचलायची... ”; गौतमी पाटील अपघात प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना घेतलं फैलावर, म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp