Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Dhangekar : “ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार फिरतात, त्यांनी उचलायची… ”; गौतमी पाटील अपघात प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना घेतलं फैलावर, म्हणाले…

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 5 October 2025, 13:09

पुणे : पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील आता चांगलीच चर्चेत आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करत गौतम पाटीलला उचलायचं की नाही? असा थेट सवाल करत याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र, चंद्रकांतदादांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत, “गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?” अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!” असं म्हणत टीका केली होती.

आता या प्रकरणात शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी उडी घेतली असून, चंद्रकांत पाटील यांना चांगलेच सुनावले आहे. तसेच गौतमी पाटीलचा देखील खरपूस समाचार घेतला आहे.

अपघात प्रकरणाबाबत रविंद्र धंगेकर यांनी पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीची माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचे सांगत तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते, तसेच फोनवरून याला उचला त्याला उचला असे आदेश देणाऱ्या चंद्रकातं पाटील यांनी पोलिसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे धंगेकर म्हणाले आहेत.

 

चंद्रकांत पाटील यांच्या व्हायरल व्हिडिओवर धंगेकर म्हणाले, ‘ज्यांच्या आजूबाजूला गुन्हेगार फिरतात, त्यांनी ह्याला उचला, त्याला उचला सांगू नये. एका ऑफिसमध्ये बसून गौतमीला का उचलले नाही, असे व्हिडीओतून चंद्रकांत पाटील म्हणत असल्याचे पुणेकरांनी पाहिले. त्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार फिरत असताना ह्याला उचला, त्याला उचला असे त्यांनी सांगू नये. खरेच जर अपघातग्रस्ताला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी थेट पोलिसांना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी. ऑफिसमध्ये बसून फोन करून, त्याचा व्हिडीओ तयार करून काय होईल? अशी टीका धंगेकर यांनी केली.

तसेच गौतमी पाटीलचा समाचार घेत महाराष्ट्रात गौतमी पाटील यांचे मोठे नाव आहे. ज्यावेळी मोठ्या माणसाकडून अशी चूक होते, त्यावेळी खरे तर त्यांनी माणुसकीच्या नात्याने अपघातग्रस्ताची भेट घेऊन त्यांना मदत करायला हवी. मात्र गौतमी पाटील यांनी या प्रकरणात अतिशय असंवेदनशीलपणा दाखवला. मदत सोडा, अपघातग्रस्ताची त्यांनी साधी भेटही घेतली नाही.’

पुढे त्यांनी, पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करावी. गौतमीच्या चालकाने मद्यपान केले होते का? हे तपासावे तसेच मागून येऊन गाडीने रिक्षाला धडक दिली असेल तर त्याचा उद्देशही तपासायला हवा, असं म्हंटल आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या महिन्यात (30 सप्टेंबर) वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मरगळे नावाचे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी गौतमी ही कारमध्ये उपस्थित नव्हती. मात्र, अपघाताततील कार तिच्या नावाने असल्याने नृत्यांगणा चर्चेत आली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07
Next Post

पुणेकरांनो सावधान..! या मोठ्या घोटाळ्याचे बळी तुम्ही तर नाहीत? शहरातील बड्या कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांना 'कसं' फसवलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp