Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : मुख्यमंत्र्यांकडे साखर उद्योगातील अडचणींसंदर्भात उपाययोजनांचा सहकार मंत्र्यांकडून प्रस्ताव – हर्षवर्धन पाटील यांची माहिती

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 5 March 2026, 10:10

आदित्य बोराटे –

Indapur : इंदापूर: राज्यातील साखर कारखान्यांकडून चालू गळीत हंगामातील सुमारे रु. 5500 कोटींची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे, कारखान्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करणे आदी अडचणींवरील विविध उपाययोजनांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकार मंत्र्यांकडून पाठविण्यात यावा व या विविध मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, असे विनंतीपत्र सहकार मंत्र्यांकडून देण्यात यावे, अशी सकारात्मक चर्चा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 4) दिली.

मुंबईमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील साखर उद्योगातील अडचणी व त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यस्तरीय बैठक बुधवारी पार पडली. सदर बैठकीतील विविध मागण्या व उपाययोजनांबाबत झालेल्या चर्चेची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे रु. 5500 कोटींची एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाने इतर काही राज्य सरकारांप्रमाणे प्रति टन रु. 500 प्रमाणे अनुदान द्यावे. तसेच कारखान्यांकडे असलेल्या सुमारे 15000 कोटी कर्जाचे 10 वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात यावे. यामध्ये निम्मे व्याज कारखान्याने व निम्मे व्याज सरकारने भरावे. जलसंपदा विभागाने साखर कारखान्यांना केलेली पाणीपट्टी वाढ त्वरित रद्द करावी. सहवीज निर्मिती प्रकल्पांतून महावितरणला निर्यात केल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रति युनिट रु. 1.50 इतके अनुदान पुढे चालू ठेवावे. प्रदूषण नियामक मंडळाकडून होणारा नाहक त्रास होऊ नये म्हणून वरिष्ठ स्तरावर बैठकीचे आयोजन करावे, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील या सर्व मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार मंत्र्यांच्या वतीने पाठविण्याचे ठरले, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच या सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात मुंबईत बैठक आयोजित करण्याचे विनंतीपत्र सहकार मंत्र्यांनी द्यावे, असेही ठरल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

 

या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जयंतराव पाटील, प्रकाशराव सोळंकी, प्रताप ओहोळ, डॉ. पांडुरंग राऊत, राजवर्धन पाटील आदींसह साखर आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12

मोबाइल होणार स्वस्त? GST कौन्सिलच्या बैठकीत 18% करकपातीचा मोठा निर्णय होण्याची शक्यता!

Sunday, 30 August 2026, 10:50

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचा ताजा दर

Sunday, 30 August 2026, 10:45

‘भारतात मुस्लिम नको म्हणणारा हिंदू नाही!’ न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवतांचं मोठं विधान

Sunday, 30 August 2026, 10:40
Next Post

Ranjangaon: ठिबक संच चोरणारी टोळी सक्रिय! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; रांजणगाव येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp