Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 12:45
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court हडपसर, ता. ७ : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला तब्बल २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पोक्सो गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेचा पुन्हा एकदा ठोस संदेश गेला आहे. Judgment of the court

हेमंत कडुबा काथार (वय ४२) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २०१८ साली एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय दंड विधान आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे विशेष खटला क्रमांक ३४०/२०१८ म्हणून सुरू होते. Judgment of the court

 

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता लीना पाठक यांनी प्रभावी बाजू मांडली. तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी म्हांगरे यांनी भौतिक व दस्तऐवजी पुरावे वेळोवेळी न्यायालयात सादर करत खटल्याची भक्कम मांडणी केली. Judgment of the court

सर्व साक्षीदार, पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धाक असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. Judgment of the court

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिर यांच्या मार्गदशनाखाली पोलीस हवालदार संभाजी म्हांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.