Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 21:10

पुणे: गुजरातमधील राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याला ‘रॉ’ (RAW) अधिकारी असल्याची बतावणी करून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाइन व्यवहारातून गोठवण्यात आल्यानंतर ते पुन्हा सुरू करून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत परेश प्रवीण कोठारी (रा. सातारा रोड, पुणे) याच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री राजकोटमधील व्यापाऱ्याच्या बँक ऑफ बडोदा खात्यात वेगवेगळ्या खात्यांतून ₹१,००० चे दोन आणि ₹२,००० चा एक असे एकूण ₹४,००० जमा झाले. त्यानंतर संबंधित बँक खाते गोठवण्यात आले. याबाबत चौकशी केली असता ही रक्कम पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन खात्यांतून जमा झाल्याचे समोर आले.

यानंतर व्यापाऱ्याने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. व्हॉट्सअॅप कॉलवर समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘रॉ’ अधिकारी अशी करून दिली. त्याने अनेकांची बँक खाती अशाच पद्धतीने गोठविल्याचा दावा करत खाते पुन्हा सुरू करण्यासाठी सुरुवातीला ₹५ लाखांची मागणी केली. नंतर ही रक्कम सुमारे ₹४.२५ लाखांवर ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही व्यापाऱ्याला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जून महिन्यात व्यापाऱ्याने पुण्यातील सातारा रस्त्यावरील एका कॅफेमध्ये संबंधित व्यक्तीची भेट घेतली. त्या वेळी त्याने ‘पोलिस मित्र’ असे लिहिलेले ओळखपत्र दाखवून स्वतःचे नाव परेश कोठारी असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. बैठकीतही खाते सुरू करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

यानंतर व्यापाऱ्याने कायदेशीर सल्ला घेत १३ जुलै रोजी पुणे गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतरही व्हॉट्सअॅप संदेश आणि फोनद्वारे धमक्या मिळत राहिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तपासादरम्यान खंडणी मागितल्याचे प्राथमिक निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सातारा रस्त्यावरील पंचमी चौक परिसरात सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या परेश कोठारीला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp