Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 13:19

IPS News हैदराबाद, ता. ७ :महिलांच्या सुरक्षेबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या महिला पोलिस आयुक्त बी. सुमती यांनी एक धाडसी आणि अनोखा प्रयोग केला. कोणतेही पोलिस संरक्षण न घेता, सामान्य महिलेसारख्या गुप्त वेषात त्या मध्यरात्री बसस्टॉपवर एकट्या उभ्या राहिल्या. मात्र पुढील तीन तासांत घडलेला प्रकार महिलांच्या सुरक्षेवरील गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारा ठरला. IPS News

१ मे रोजी मलकाजगिरीच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुमती यांनी ही गुप्त मोहीम राबवली. मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या वेळेत त्या साध्या वेशात बसस्टॉपवर थांबल्या होत्या. या संपूर्ण काळात त्यांच्याजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती.

या प्रयोगादरम्यान तब्बल ४० पुरुष त्यांच्या आसपास जमा झाले. काही जण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी गांजाचे सेवन केल्याचेही निदर्शनास आले. विशेष म्हणजे या व्यक्तींना आपण एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी बोलत आहोत, याची कल्पनाही नव्हती. या घटनेने रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

 

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींची ओळख पटवली. मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. महिलांचा सन्मान, सार्वजनिक ठिकाणी वर्तन आणि सुरक्षेबाबत त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आली. शिक्षा करण्यापेक्षा मानसिकता बदलण्यावर भर देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे बी. सुमती यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुप्त मोहिमा राबवल्या आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी डीएसपी असताना त्यांनी काझीपेट रेल्वे स्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी अशीच मोहीम हाती घेतली होती.

तेलंगणा केडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. सुमती या कठोर आणि नाविन्यपूर्ण पोलिसिंगसाठी ओळखल्या जातात. राज्य गुप्तचर विभागात काम करताना त्यांनी माओवादी आत्मसमर्पण मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, पोलिस दलात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुधारणा राबवण्यातही त्या आघाडीवर आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03
Next Post

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.