Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 14:37

Good News लोणी काळभोर, ता. ७ : नागरिकांचा हरवलेला, गहाळ झालेला तसेच विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १८ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करून लोणी काळभोर पोलीस ठाणे यांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, हरवलेले दागिने व मोबाईल परत मिळाल्यानंतर काही नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले. Good News

दरम्यान, या मुद्देमालामध्ये सुमारे १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोने, १ लाख रुपयांचे चांदीचे दागिने तसेच सव्वादोन लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. गुन्ह्यांचा कसून तपास, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. Good News

 

लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ७) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुद्देमाल वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, पोलीस हवालदार  रवी आहेर, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे, पोलीस अंमलदार योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आला. वडकी येथील राहू खंडू मोडक यांना ९.३६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, तर कवडीपाट टोलनाका येथील किसन बबन इंगळे यांना ३ ग्रॅम सोने व चांदीच्या पट्ट्या परत देण्यात आल्या. तसेच कदमवाकवस्ती परिसरातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून तीन तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले होते. हा संपूर्ण मुद्देमाल मूळ मालक शांती शंकर सोलंखी यांना परत करण्यात आला. Good News

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी अथवा गहाळ झालेले मोबाईल फोनही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. सुमारे एक लाख रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन एकनाथ सोपान मेमाणे, रतनमाला नंदकुमार बोराटे, रमेश रामचंद्र जुगदळ, रेवती रमा गुप्ता, साजीद तांबोळी आणि दत्तात्रय ज्ञानोबा कोतवाल यांना परत करण्यात आले.

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २०२५ मधील मोठ्या घरफोडीचा छडा लावत पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी आरोपीला अटक केली होती. या कारवाईत चोरीस गेलेले ५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. ते दागिने मूळ मालक अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांना परत देण्यात आले. तसेच हरवलेले चार मोबाईल फोन शोधून मुस्कान जाधव, शाम मिसाळ, अक्षय कारंडे आणि सुधीर खताळ यांनाही सुपूर्त करण्यात आले. गुन्हे उघडकीस आणत नागरिकांचा विश्वास जपणाऱ्या लोणी काळभोर आणि फुरसुंगी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.