Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 15:01

Khed News खेड, ता. ७ : अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात खेड येथील न्यायालयाने आरोपी रोहन शंकर पालकर (वय २३, रा. खारी-सुसेरी, ता. खेड) याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे समाजात बालकांवरील अत्याचारांविरोधात कठोर संदेश गेला असून पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पी. एस. चांदगुडे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ६ मे २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. Khed News

कोविड काळात घडलेल्या या घटनेत पीडित बालिका ऑनलाईन शिक्षणासाठी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच हा प्रकार कुणालाही सांगितल्यास पीडिता व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. भीतीमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली. मात्र, काही शारीरिक बदल जाणवल्यानंतर आईने तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Khed News

 

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३७६, ५०६ तसेच POCSO Act अंतर्गत विविध कलमान्वये दोषी धरले. कलम ३७६ आणि पोक्सो कलम ४ व ६ अंतर्गत आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८, १० आणि १२ अंतर्गत अनुक्रमे ३ वर्षे, ५ वर्षे आणि १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. Khed News

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय तपासणीत आलेला डीएनए अहवाल हे आरोपीविरोधातील महत्त्वाचे पुरावे ठरले. सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी केला, तर कोर्ट पैरवीसाठी चंद्रमुनी ठोके यांनी सहकार्य केले. सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. या निकालाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, बालकांवरील अत्याचारांविरोधात न्यायव्यवस्थेने पुन्हा एकदा कठोर भूमिका स्पष्ट केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42
Next Post
Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.