Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 10 September 2026, 14:51

दौंड, ता. 10 : दोन दुचाकींवरून आलेल्या 6 अनोळखी सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने घरात घुसून दहशत माजवत दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोड्याचा प्रयत्न उधळण्यासाठी पुढे आलेल्या धाडसी तरुणाच्या डोक्यात दरोडेखोरांनी लोखंडी शस्त्राने कडक वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि घरातील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लुटून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. दौंड तालुक्यातील मलठण परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 09) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे मलठण हद्दीतील दळवीवस्ती येथे राहणारे शेतकरी भगवान पांडुरंग दळवी यांच्या राहत्या घरावर दरोडेखोरांनी निशाणा साधला. दोन मोटारसायकलवरून आलेल्या 6 अनोळखी दरोडेखोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने थेट घरात घुसखोरी केली.

यावेळी मुलगा स्वप्नील दळवी याने दरोडेखोरांचा प्रतिकार केला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी स्वप्नीलच्या डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार केला. या जीवघेण्या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरात धुमाकूळ घालत घरातील दोन मोबाईल फोन आणि भावजय साधना दळवी यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरून नेले.

याप्रकरणी भगवान पांडुरंग दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात 6 अनोळखी चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील कडक तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51
Next Post

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात... पहा धक्कादायक Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp