Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 September 2026, 14:46

पुणे : बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय 68) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय 44) यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीचे वैधानिक लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय 51) यांनी यासंदर्भात अधिकृत फिर्याद दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हा संपूर्ण गैरव्यवहार 1 जानेवारी 2018 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत घडला. शिरीष देशपांडे हे पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आणि योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. सुरुवातीला लेखापरीक्षणात संशयास्पद बाबी आढळल्याने डिसेंबर 2025 मध्ये दोघांनाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर संस्थेने खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला.

तपासात आणि ऑडिट अहवालात आरोपींनी केलेले विविध गैरप्रकार समोर आले आहेत.संचालक मंडळाची कोणतीही परवानगी न घेता नियमबाह्य रीतीने कर्जे मंजूर केली. तारण न घेता कर्जे देणे आणि परस्पर व्याज माफ करण्याचे प्रकार केले.आरोपींनी स्वतःसाठी 0% व्याजदराने कर्जे घेतली.

 

‘बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीला बेकायदेशीरपणे अ‍ॅडव्हान्स दिले आणि ही संस्था बँकेची उपकंपनी असल्याचे दाखवले. यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची बनावट स्वाक्षरी करून सदस्यत्व नोंदवले व नंतर रद्द केले.ROC च्या संकेतस्थळावर खोटी ताळेबंद पत्रके अपलोड केली. तारण मालमत्तांच्या विक्रीतून आलेली रक्कम सोसायटीत जमा केली नाही. तसेच कर्जदारांच्या नकळत त्यांच्या खात्यात अतिरिक्त पैसे टाकून ते इतरत्र वळवले.

संचालक मंडळाला अंधारात ठेवून मालमत्ता खरेदी करणे आणि देखभालीचा अफाट खर्च दाखवून या दोघांनी संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान केले. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21
Next Post

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp