Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 October 2026, 18:13

पुणे, ता. 19 : वडाचीवाडी (ता. हवेली) येथील जमीन भाड्याने देण्याच्या व्यवहारातून ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत आपली 17 गुंठे जमीन बक्षीसपत्राद्वारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप सेवानिवृत्त शिक्षक रामदास ज्ञानोबा उगले यांनी हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशनच्या स्वाती सुभाष डिंबळे यांच्यावर केला आहे. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा दावा करत उगले यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. तसेच, न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा विचार करण्याची वेळ आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

रामदास उगले यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2024 मध्ये त्यांनी स्वाती डिंबळे यांना तीन गुंठे जमीन आणि दोन कॉटेज भाड्याने देण्याचे ठरविले होते. मात्र, भाडेकरार करण्याच्या कारणावरून त्यांना विश्वासात घेण्यात आले आणि 31 मार्च 2024 रोजी 17 गुंठे जमिनीचे बक्षीसपत्र करून घेण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या व्यवहारात आपल्याला अपेक्षित असलेला भाडेकरार न होता जमिनीची मालकीच दुसऱ्याच्या नावावर गेल्याचे उगले यांचे म्हणणे आहे.

डिंबळे यांनी त्यांना भाऊ मानल्याचे सांगून विश्वास संपादन केला. मात्र, स्वतःला मुलगी, भाऊ, बहीण आणि पुतणे असताना आयुष्यभराची कमाई दुसऱ्याच्या नावावर करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित बक्षीसपत्रातील नातेसंबंधांच्या नोंदींबाबतही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

मोबाईलमधील पुरावे पुसल्याचा आरोप

28 मे 2026 रोजी दुपारी एकच्या सुमारास स्वाती डिंबळे आणि त्यांचे वाहनचालक कपिल अनगोंडे यांनी आपली गाडी अडवून मोबाईलमधील महत्त्वाचे व्हिडिओ आणि अन्य पुरावे जबरदस्तीने हटविल्याचा आरोप उगले यांनी केला आहे. या घटनेनंतर काळेपडळ पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली; मात्र आपली तक्रार गांभीर्याने घेतली गेली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच, कपाटातील महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा आणि घरातून बाहेर काढण्यात आल्याचाही आरोप उगले यांनी निवेदनात केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्तांकडेही दाद मागितल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

भाडे, कॉटेज आणि झाडांच्या नुकसानीचाही मुद्दा

उगले यांनी दिलेल्या निवेदनात एक लाख रुपये उसने दिल्याचा, भाड्याची रक्कम थकविल्याचा तसेच परिसरातील कॉटेज आणि लोखंडी झोपाळा तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांत जोपासलेली दुर्मीळ औषधी वनस्पती आणि झाडांचे नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागांकडे तक्रार केल्याचे नमूद केले आहे. योगसाधना आणि औषधी वनस्पतींच्या माध्यमातून सुरू असलेले आपले कामही अडचणीत आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जमिनीच्या बक्षीसपत्राची कायदेशीर वैधता, कथित फसवणूक, कागदपत्रे चोरीला गेल्याचा आरोप आणि मोबाईलमधील पुरावे हटविल्याच्या तक्रारीची तपासणी करावी, अशी मागणी रामदास उगले यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशनच्या स्वाती सुभाष डिंबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. संबंधित व्यक्तींची प्रतिक्रिया आणि पोलिसांची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे उगले यांनी केलेले आरोप हे सध्या त्यांचे दावे असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50
Next Post

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp