Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 19:13

पुणे: रेल्वे प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, मोबाईलवर रील्स पाहणे किंवा मोठ्याने फोनवर बोलणे आता महागात पडू शकते. सहप्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी रेल्वेने अशा प्रकारांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. प्रवासादरम्यान काही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावतात, व्हिडिओ पाहतात किंवा मोठ्याने बोलतात. तसेच मोबाईलची रिंगटोनही अनेकदा मोठ्या आवाजात वाजवली जाते. त्यामुळे शांततेत प्रवास करू इच्छिणाऱ्या इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

रेल्वे प्रवासात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास एक हजार रुपयांचा दंड, तर पुन्हा नियम मोडल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये दंड आकारून संबंधित प्रवाशाला रेल्वेतून उतरवण्याची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

रेल्वे प्रवास अधिक शांत आणि सुखकर होण्यासाठी प्रवाशांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवावा. गाणी ऐकताना, व्हिडिओ किंवा रील्स पाहताना इयरफोनचा वापर करावा. फोनवर बोलताना आवाज कमी ठेवावा आणि अनावश्यक लांब संभाषण टाळावे. एखाद्या प्रवाशामुळे त्रास होत असल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांकडे किंवा रेल मदत अॅपवर तक्रार करता येते. रेल्वे प्रवासात प्रत्येकाने इतरांच्या सोयीचा विचार केल्यास सर्वांचा प्रवास अधिक शांततापूर्ण आणि आरामदायी होऊ शकतो.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15
Next Post

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp