Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 September 2026, 14:59

लोणी काळभोर, ता. 10 : एसडीएम कार्यालयात क्लार्क पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणीच्या आईचे तब्बल 65 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ते बजाज फायनान्सच्या सासवड शाखेत गहाण ठेवून लाखो रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ‘चहापाण्या’च्या नावाखाली वेळोवेळी ऑनलाइन पैसे उकळले आहेत. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॅन्टीनमध्ये घडली आहे.

याप्रकरणी नम्रता संजय शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम मनोहर वाघमारे (रा. त्रिशूल हाउसिंग सोसायटी, सासवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता शिंदे यांची शुभम वाघमारे याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख ऑगस्ट 2025 मध्ये झाली. शुभम याने आपण वकील असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये हडपसर येथे भेटीदरम्यान शुभम याने मंत्रालयातील विविध मंत्र्यांच्या ओएसडी अधिकाऱ्यांशी आपली चांगली ओळख असल्याचे सांगून सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

नोव्हेंबर 2025 मध्ये शुभम याने एसडीएम कार्यालय, पुणे येथे ज्युनिअर क्लार्कच्या जागा निघणार असून, नोकरी लावण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तसेच जाहिरात निघाल्यानंतर तो स्वतः नम्रता यांच्या आई-वडिलांशी बोलणार असल्याचे सांगून, तोपर्यंत घरी काहीही सांगू नये, असेही त्याने नम्रता शिंदे यांना सांगितले. यानंतर शुभम याने नम्रता यांच्याकडून विविध कागदपत्रे घेतली. मंत्रालयातील ओएसडी अधिकाऱ्यांचे ‘चहापाणी’, ये-जा आणि इतर खर्चाच्या नावाखाली त्याने वेळोवेळी गुगल-पेद्वारे आतापर्यंत 75 हजार रुपये घेतले आहे.

‘आजच पाच लाख रुपये द्या’; सोन्याचे दागिने घेऊन फायनान्समध्ये गहाण
9 फेब्रुवारी 2026 रोजी शुभम याने क्लार्क पदासाठी दुसरा उमेदवार पैसे देत असल्याचे सांगून तातडीने पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. मात्र, आपल्याकडे तत्काळ पैसे नसल्याचे नम्रता यांनी सांगितले. त्यावेळी शुभम याने सोने असल्यास ते द्या, आपल्या ओळखीच्या ठिकाणी गहाण ठेवून पैसे भरतो आणि नंतर पैसे मिळाल्यावर सोने सोडवून घेऊ, असे सांगितले. सरकारी नोकरीच्या आशेवर विश्वास ठेवून नम्रता यांनी 9 फेब्रुवारी रोजी एमआयटी कॅन्टीन, लोणी काळभोर येथे आईचे 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे झुमके, 15 ग्रॅमचा नेकलेस आणि 15 ग्रॅमची बॉलमाळ, असे एकूण सुमारे 6 तोळे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने शुभम याच्याकडे दिले.

 

त्यानंतर शुभम याने त्यातील नेकलेस आणि बॉलमाळ बजाज फायनान्स, सासवड येथे गहाण ठेवून 2 लाख 72 हजार 600 रुपये घेतल्याची पावती पाठवली. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी मंगळसूत्र आणि झुमकेही त्याच ठिकाणी गहाण ठेवून 3 लाख 34 हजार रुपये घेतल्याची दुसरी पावती पाठवली आहे. अशा प्रकारे दागिन्यांवर एकूण 6 लाख 6 हजार 600 रुपये कर्ज घेतले आहे. दागिने दिल्यानंतर नम्रता यांनी नोकरीची जाहिरात कधी निघणार, अशी विचारणा केली असता पुढील महिन्यात जाहिरात येईल आणि केवळ नाममात्र अर्ज केल्यानंतर निवड यादीत नाव येईल, असे शुभम याने सांगितले. मात्र, मार्च 2026 मध्ये नम्रता यांनी पुन्हा विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला . त्यानंतर त्यांनी आईला संपूर्ण प्रकार सांगितला.

दरम्यान, 27 जून 20 26 रोजी शुभम याने 4 जुलै 2026 रोजीचा सात लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश वटला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर 9 जुलै रोजी 500 रुपयांच्या मुद्रांकपत्रावर करारनामा करून 18 जुलैपर्यंत 6 .5 तोळे सोने आणि 75 हजार रुपये परत करण्याचे आश्वासन दिल्याचेही नम्रता यांनी सांगितले आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर शुभम फोन उचलत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याचे त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम मनोहर वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फायनान्स कंपनीने मालकीची खात्री केली का?’

शुभम वाघमारे हा सोन्याचे दागिने घेऊन कर्जासाठी गेला असताना संबंधित अधिकाऱ्यांनी त्या दागिन्यांची मालकी कोणाची आहे, याची खात्री केली का, तसेच सादर केलेल्या आधारकार्डवरील फ्लॅट त्यांच्या वडिलांनी सुमारे दहा वर्षांपूर्वीच विकला आहे. फायनान्स कंपनीकडे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले जात नसतील आणि संगणकातील फाईल खराब झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची,तसेच संबंधित शाखेत सुरक्षा रक्षक नाही. सोनाराकडे वस्तू घेताना पावती पाहण्याचा नियम असेल, तर फायनान्स कंपन्यांनीही सोन्याच्या दागिन्यांची मालकी आणि संबंधित कागदपत्रांची खात्री करणे आवश्यक नाही का, असा सवाल नम्रता शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेचन्यायालयाने सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप दागिने पोलिसांकडे जमा करण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp