Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 September 2026, 14:21

पुणे : खराडी परिसरात दोन विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ, पैशांची मागणी, मारहाण आणि धमकावल्याचे आरोप करत खराडी पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. दोन्ही घटना वेगवेगळ्या कालावधीतील असून, एका महिलेने 2013 पासून छळ होत असल्याचा आरोप केला आहे, तर दुसऱ्या महिलेने जून 2025 पासून पैशांसाठी त्रास देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पहिल्या प्रकरणातील 36 वर्षीय महिलेचे 30 मे 2013 रोजी विनय सालके यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून घरखर्चासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप तिने केला आहे. नोकरी सोडून पुण्यात आल्यानंतर घरकाम आणि आर्थिक बाबींवरून वारंवार वाद होत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. 2015 मध्ये पतीसह घराबाहेर काढल्याचा, तर 2016 मध्ये पतीने मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

गर्भावस्थेत तसेच मुलगी झाल्यानंतरही मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचे तिने सांगितले. तसेच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वाहनात जीपीएस व कॅमेरा बसविण्यात आल्याचा आणि मोबाईलमध्ये लोकेशन ट्रॅकिंग ॲप्स टाकल्याचा आरोपही तिने केला आहे. 2019 मध्ये केसनंद येथे फ्लॅट आणि 2021 मध्ये चऱ्होली-आळंदी रोड परिसरात दुसरा फ्लॅट घेण्यात आला. या दोन्ही मालमत्तांच्या कर्जाचे हप्ते आपण भरत असल्याचा दावा महिलेने केला आहे. 2025 मध्ये पतीने घटस्फोटाची नोटीस पाठविल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

दुसऱ्या प्रकरणातील 26 वर्षीय महिलेचे अजय लकडे यांच्याशी 12 जून 2025 रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांनी, म्हणजे 17 जून 2025 रोजी, सासरच्या मंडळींनी पूजेसाठी माहेरून पाच हजार रुपये आणण्यास सांगितल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर पतीकडून कर्ज व व्याजाचे पैसे भरण्यासाठी वारंवार पैशांची मागणी होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जून 2025मध्येच पतीने गळा दाबून, चापट मारून व शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

 

तसेच 10 जुलै 2025 रोजी पतीने फोन करून घरातून निघून जाण्यास सांगत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर सासरच्या मंडळींनी कपडे बॅगेत भरून तिला घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सासू व तिच्या मैत्रिणीने माहेरी येऊन शिवीगाळ केल्याचा, तर 15 जून 2026 रोजी सासू व दोन जावांनी आईला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या दोन्ही प्रकरणांत पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून, पुढील तपास खराडी पोलिस करीत आहेत

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp