Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन-सोरतापवाडी गटात राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार-जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर उरुळी कांचन येथे निवडणुक प्रचाराचा शुभारंभ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 January 2026, 18:28

उरुळी कांचन, (पुणे) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात सध्या सुरू असलेल्या प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गावागावांतून राष्ट्रवादीला भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी व्यक्त केला.

उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मारुती मंदिरात करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष कोरेकर बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक संतोष कांचन, सुनील कांचन, बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी उपसभापती हेमलता बडेकर, सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, भाऊसाहेब कांचन, मयूर कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, भाऊसाहेब तुपे, शिंदवणेचे माजी सरपंच गणेश महाडिक, उद्योजक सागर कांचन, शहराध्यक्ष रामभाऊ तुपे, ओबीसी नेते धनंजय दिक्षित, सुभाष बगाडे, आप्पा बगाडे, दिलीप गाडेकर, स्वराज तुपे, आदि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून जितेंद्र बडेकर, सोरतापवाडी गणातून आण्णा महाडिक तर उरुळी कांचन पंचायत समिती गणातून कोमल गणेश कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिक नेतृत्व, आणि तळागाळातील नागरिकांशी असलेला थेट संपर्क हीच या उमेदवारांची खरी ताकद असून त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, असेही कोरेकर म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन म्हणाले, “प्रचारादरम्यान उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विकासकामांचा लेखाजोखा मांडत पुढील काळातील आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात येत आहे. “राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असावे,” हा संदेश देत राष्ट्रवादीचे उमेदवार जनतेशी जोडले आहेत. उरुळी कांचन गटातील तिन्ही उमेदवार हे अनुभवी, अभ्यासू व जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे असल्याचे सांगितले. “जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. हा विश्वासच आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देईल,” असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांत उरुळी कांचन परिसरात विकासकामे केली आहेत. पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्त्यांची कामे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सोयी, महिला व युवकांसाठी विविध उपक्रम यामुळे पक्षाबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी राष्ट्रवादीने सातत्याने काम केल्यामुळे मतदारांचा कौल पक्षाच्या बाजूने लागेल.

दरम्यान, एकूणच उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून, येत्या निवडणुकीत तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास विविध पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
Ahilyanagar News: 'Drug mafia' in khaki uniform arrested! Ahilyanagar police constable arrested from Pune; Many shocking revelations in the investigation

Ahilyanagar News: खाकी वर्दीतला 'ड्रग्ज माफिया' जेरबंद! अहिल्यानगरचा पोलीस हवालदार पुण्यातून अटकेत; तपासात अनेक धक्कादायक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.