Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनोरीत धोकादायक स्फोटकांचा बेकायदा साठा उघड; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, सासवड पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 23 August 2026, 11:36

सासवड, (पुणे): सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल तीस लाख 67 हजार हजार 430 रुपयांचा बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थांचा साठा आढळून आला आहे. सोनोरी (ता. पुरंदर) हद्दीतील शेतजमीन गट क्रमांक 260 मध्ये हा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी तीन वाहनांमधून स्फोटकांचा साठा जप्त केला असून, वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी राजेंद्रकुमार रामदयाल बाहेती (रा. तावरे कॉलनी, पुणे) व सागर हिम्मत मंडल (वय 30, रा. चऱ्होली, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सचिन किवळे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सोनोर्‍यातील संबंधित शेतजमिनीत धोकादायक पद्धतीने स्फोटक पदार्थांचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी कारवाई केली. कारवाईदरम्यान सागर मंडल हा संबंधित स्फोटक साठा कंपनीचा मॅनेजर असल्याचे समोर आले. त्याच्याकडे स्फोटक साठवणुकीच्या परवान्यांबाबत विचारणा केली असता, चार गोडाऊनचे परवाना क्रमांक असल्याची माहिती त्याने दिली.

पोलिसांनी तीन वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये DECCAN POWER × 40 MM चे 61 बॉक्स, DECCAN PRIME × 83 MM चे 19 बॉक्स तसेच नोनल डेटोनेटरचे तीन बॉक्स आढळून आले. विशेष म्हणजे, काही स्फोटक पदार्थांची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही तपासात समोर आले.

 

तसेच DECCAN PRIME स्फोटक आणि डेटोनेटर एकाच वाहनात एकत्र ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारे स्फोटक पदार्थांची वाहतूक व साठवणूक केल्याने स्फोट होऊन मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत स्फोटक पदार्थांसह भारत बेंझचा ट्रक, महिंद्रा बोलेरो पिकअप आणि अशोक लेलंडचा ट्रक, अशी तीन वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित परवानाधारक गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले असून, पोलिसांनी त्या ठिकाणी सील/लेबल लावले आहे.

दरम्यान, या प्रकरणात राजेंद्रकुमार रामदयाल बाहेती (रा. तावरे कॉलनी, पुणे) यांच्या सांगण्यावरून सागर मंडल याने स्फोटकांचा बेकायदेशीर साठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सासवड पोलिसांच्या या कारवाईमुळे सोनोर्‍याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या स्फोटकांचा साठा आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

वरवंडमध्ये शेतरस्त्यावरून वाद पेटला, रस्ता अडवून शेतकरी कुटुंबाला शिवीगाळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp