Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत फटाक्यांचा अवैध साठा जप्त! 4 जणांवर गुन्हा दाखल, 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 17 June 2026, 20:04

बारामती, (पुणे) : कोणताही अधिकृत परवाना नसताना व्यावसायिक आणि हाय-प्रोफाइल फॅन्सी फटाक्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार जणांना बारामती शहर पोलिसांनी वाहनांसह ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने फलटण-बारामती रोडवर मळद गावच्या हद्दीतील चिंचबनजवळ मंगळवारी (ता. 16 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.

सोमनाथ सदाशिव होले (वय 54, रा. खंडोबानगर बारामती ता बारामती) संदिप युवराज नेटके (वय 33, रा. साठेनगर कसबा बारामती ता. बारामती) गणेश बाबासाहेब गरगडे (वय 32, रा. गुणवरे ता. फलटण जि सातारा) व सुरेश बापूराव गवारे (वय 60, रा. देसाई इस्टेट बारामती ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यांच्याकडून वाहनासह तब्बल 7 लाख 79 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 16 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार वैभव साळवे हे पथकासह मळद परिसरात गस्तीवर होते. त्याच वेळी फलटणकडून बारामतीच्या दिशेने काही संशयास्पद वाहने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिंचबनजवळ नाकाबंदी लावली.

 

पोलिसांनी समोरून येणाऱ्या दोन पियाजिओ तीन चाकी टेम्पो, एक महिंद्रा विप्रो आणि एका अशोक लेलंड छोटा हत्ती गाडीला थांबवून तपासणी केली असता, या चारही गाड्यांमध्ये स्फोटक आणि अत्यंत ज्वलनशील असलेल्या फॅन्सी फटाक्यांचे शेकडो बॉक्सेस खच्चून भरलेले होते. यामध्ये ‘ताजमहाल किंग’ ‘इम्पेरियल रेड बिजली’ अशा विविध नामांकित कंपनीचे फटाक्यांचे मोठे बॉक्स होते. याप्रकरणी चौघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे हे करत आहेत

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! भीमाशंकर मंदिरात आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत घेता येणार थेट दर्शन

Thursday, 18 June 2026, 23:01

पुणे रेल्वेचा नवा चेहरा! आळंदीत ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ तर स्थानकावर 12 प्लॅटफॉर्मची सुविधा

Thursday, 18 June 2026, 22:32

पुढच्या महिन्यात लग्न; जय्यत तयारी सुरु, विमानं बुक केली, 17 कोटी खर्च केले अन् अचानक काळाचा घाला; नेमकं काय घडलं?

Thursday, 18 June 2026, 22:00

हिंजवडी मेट्रो लाईन 3 सुसाट! 15 जुलैपर्यंत 12 स्टेशन्स सुरू होणार; ‘पायलट’ म्हणून महिलांची फौज सज्ज

Thursday, 18 June 2026, 21:17

पुण्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश!10 हजारांहून अधिक ‘ट्रामाडोल’ गोळ्यांसह दोघांना अटक

Thursday, 18 June 2026, 20:40

हनीमूनदरम्यान हत्या! जोडप्याने सोबत वाढदिवस साजरा केला; दारू पिऊन झोपले अन् सकाळी उठल्यावर…

Thursday, 18 June 2026, 19:53
Next Post

शिवाजीनगरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; परदेशी तरुणीसह तिघींची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.