Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली; हवेली तालुक्यात बंदी असतानाही फिरणाऱ्या शिंदवणे येथील आरोपीला बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 22 June 2026, 16:32

उरुळी कांचन, (पुणे) : उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना लावलेल्या अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी (ता. 20) संध्याकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

आकाश मंजाबापू राखपसरे (वय 26, रा. काळेशिवार शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) असे उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गुरुनाथ युवराज गायकवाड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश राखपसरे अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहे. राखपसरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने अट घातली होती की, “जोपर्यंत संबंधित खटला पूर्ण संपत नाही तोपर्यंत आरोपीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या हद्दीत अजिबात प्रवेश करायचा नाही.”

 

शनिवारी (ता. 20) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-सोलापूर हायवेवर गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. यावेळी सहाय्यक फौजदार सचिन घाडगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी आकाश राखपसरे हा उरुळी कांचन गावच्या हद्दीत पांढरस्थळ येथील आपल्या राहत्या घराजवळ केनॉलवर उघडपणे फिरत आहे.

दरम्यान, या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली. दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पांढरस्थळ केनॉल परिसरातून आकाश राखपसरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाच्या कायदेशीर आदेशाची अवहेलना आणि अवज्ञा केल्याप्रकरणी आरोपी आकाश राखपसरे याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे आणि विकास कापरे यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जगताप हे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

पुणे सोलापूर महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.