Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 19:24

मुंबई: देशभरात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून निर्माण झालेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या घडामोडी ताज्या असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी केली. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी आयुक्तांना सादर केले.

रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत अनेक तक्रारी, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील माहितीमुळे पेपरफुटीचा संशय अधिक गडद झाला आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी कथित प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप स्टेटसवर फिरल्याचा आरोप असून, त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर “१०० पैकी ९० प्रश्न जुळले” आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचे दावेही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसेच २० मार्च रोजी ज्याला कथित प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठवण्यात आले, त्या उमेदवाराला परीक्षेत उच्च गुण मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लाखो स्पर्धा परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी हा विषय एमपीएससीच्या अखत्यारित येत असल्याने उपलब्ध सर्व कागदपत्रे आयोगाकडे पाठवली जातील आणि आयोग आवश्यक ती कारवाई करेल, असे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया आणि नियुक्त्या स्थगित कराव्यात, गैरव्यवहार सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ! तरुणीने भरसभेत ओतून घेतलं अंगावर पेट्रोल; जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप

Monday, 27 July 2026, 18:42

अंगणवाडीतील पोषण आहारात राज्य सरकारचा मोठा बदल! आता घरपोच मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि पौष्टिक पफ

Monday, 27 July 2026, 18:10

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31
Next Post

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.