लहू चव्हाण
पाचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक, काॅंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांची उद्या (८ जानेवारी) ७९ वी जयंती विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कुर्माराव रेपाका यांनी दिली.
गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाई येथील श्रीमती पी. सी. अलवाणी विशेष मानसिक निवृत्त मुलांच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर स्कूल मधील विविध वयोगटातील ३५ विद्यार्थ्यांची डॉ.पतंगराव कदम यांचे शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय कार्य आणि भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्या निकेतन येथील शिक्षिका तृप्ती कांबळे काम पाहणार आहेत.