राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी केमिकल कंपनीत आज सकाळी अचानक भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतमधील हर्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीमध्ये एम ई प्लांटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. कंपनीत वेल्डिंग मेंटनन्सचे काम चालू होते. वेल्डिंग करत असताना वेल्डिंगची ठिणगी यावेळी खाली पडलेल्या केमिकलवर पडल्याने आग लागल्याची घटना घडली.(Fire News)
हार्मोनी कंपनीमधील कामगार तसेच पांढरेवाडी, कुरकुंभ, मुकादमवाडी कुरकुंभ एमआयडीसीमध्ये खळबळ उडाल्याने येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, कुरकुंभ एमआयडीसी अग्निशमन दलला आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसल्याचं कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.(Harmony Chemical Company)