पुरंदर : पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत आहोत. हा उद्घाटनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने व लवकर घेण्यात आला. मागील आठवड्यात मला सांगण्यात आले की, प्रांत व तहसीलदार जिथे बसतात तिथे त्या ठिकाणी पाऊस पडत आहे.
या प्रशासकीय इमारतीमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या आज मी बघितल्या आहेत, कॉन्ट्रॅक्टर दाराला सूचना दिले आहेत. कोणत्याही कामात हलगर्जी राहता कामा नये, जे प्रमुख लोक बसतात तिथे डस्टबिन ठेवल्या पाहिजेत. राहिलेले कामे कॉन्ट्रॅक्टरदाराने ठराविक काळात ते पूर्ण करून घ्यावीत. थोडा उशीर झाला असेल, परंतु कामात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये. आम्हाला लोकाभिमुख कारभार करायचा आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांने तसं वागलं पाहिजे. प्रशासनाला एवढी चांगली इमारत करून दिल्यावर माझ्याकडे हेलपाटे मारले नाही पाहिजे. माझ्या कामाच्या पद्धत एखाद्याने एखादे काम सांगितलं तर त्वरित सांगणार की ते होतं का नाही. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, सुदाम इंगळे, विजय कोलते, जालिंदर भाऊ कामठे, अभिजीत जगताप, दत्ता कड, दत्ता झुरंगे, प्रांत अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, कृषी अधिकारी सुरज जाधव,सावॅजनिक बांधकाम स्वाती दहिवाल, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,पोलीस निरीक्षक ऋषींकेश अधिकारी तसेच सर्व मीडिया, पत्रकार, सर्व सामान्य नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.