Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: नवीन मुठा उजवा कालव्याचे गेट फोडून पाणी वळवले; शासकीय मालमत्तेची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 2 March 2026, 11:46

Daund News: यवत, ता. 02 : नवीन मुठा उजवा कालव्यावरील गेटचे वेल्डिंग व साखळीचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी कालव्याचे पाणी बेकायदेशीररीत्या वळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सिंचन व्यवस्थेत अनियमितता निर्माण होऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अर्चना रावसाहेब कुलांगे (वय 33, शाखा अधिकारी, पाटबंधारे विभाग उरुळी कांचन, रा. उरुळी कांचन वसाहत, ता. हवेली, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध शासकीय तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना कुलांगे या पाटबंधारे विभाग, उरुळी कांचन येथे शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असून नवीन मुठा उजवा कालवा कि.मी. 43 ते 54 या हद्दीतील पाहणी, पाणीपट्टी व्यवस्थापन व सिंचन नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. गुरुवारी (ता. 26 फेब्रुवारी) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या गस्त घालत होत्या.

यावेळी बिटधारक गजानन डोंबाळे व स्थानिक अभियंता ओंकार हराळे यांच्यासह कालव्याची पाहणी करत असताना कासुर्डी (ता. दौंड) येथील भोंडवेवस्ती येथे कि.मी. 61/090 वरील अतीवाहक गेटची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी गेटचे वेल्डिंग तोडून साखळीचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. गेटची तोडफोड करून कालव्याचे पाणी शेजारील ओढ्याकडे वळविण्यात आले होते.

 

दरम्यान, या प्रकारामुळे कालव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत अनियमितता निर्माण झाली असून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पाणी वळविण्यात आल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post

Yerwada to Katraj : पुणेकरांनो, आता ट्रॅफिक विसरा! येरवडा ते कात्रज अवघ्या 20 मिनिटांत; 32,000 कोटींच्या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp