Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yerwada to Katraj : पुणेकरांनो, आता ट्रॅफिक विसरा! येरवडा ते कात्रज अवघ्या 20 मिनिटांत; 32,000 कोटींच्या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 12:00

Yerwada to Katraj : पुणे  : पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच पीएमआरडीएने (PMRDA) एका मोठ्या भुयारी मार्ग प्रकल्पावर काम सुरू केले आहे. शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या येरवडा ते कात्रज (Yerwada to Katraj) या साधारण 54 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मार्गाच्या आराखड्यात आता काही महत्त्वाचे बदल केले जात आहेत.

केवळ एकाच मार्गावर लक्ष केंद्रित न करता शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील मुख्य रस्ते या प्रकल्पाला कसे जोडता येतील, यादृष्टीने प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. हा प्रकल्प पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून यामुळे प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 32000 कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची व्यवहार्यता तपासल्याशिवाय आणि विविध तांत्रिक बाबींचे रेटिंग निश्चित केल्याशिवाय या प्रकल्पाच्या अंतिम अहवालावर शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. भुयारी मार्गातून बाहेर पडणारी वाहतूक पुन्हा मुख्य रस्त्यांवर आल्यावर तिथे कोंडी निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी या आराखड्यात घेतली जात आहे. त्यासाठी शहराच्या गरजेनुसार 6 ते 7 वेगवेगळ्या उप-मार्गांचा सध्या सखोल अभ्यास केला जात आहे.

 

या प्रकल्पाची सांगड शहराच्या पार्किंग धोरणाशी घालणे आवश्यक असल्याचे मत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या प्रवासाची पद्धत आणि त्यांची दिशा यांचा सखोल अभ्यास करूनच मार्ग निश्चित केला जाणार आहे. जर हा 54 किलोमीटरचा भुयारी मार्ग यशस्वी झाला, तर येरवडा ते कात्रज हे दीड ते दोन तासांचे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 25 मिनिटे लागतील असा अंदाज आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक जमिनीखाली वळवल्यामुळे सिग्नलवर होणारी गर्दी कमी होईल. हा प्रकल्प येणाऱ्या काळात पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

Friday, 26 June 2026, 18:52

मुळशी वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सायकर

Friday, 26 June 2026, 18:43

‘या हुसेन… या हुसेन’च्या गर्जनांनी दुमदुमले लोणी काळभोर; मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Friday, 26 June 2026, 18:40

पुण्यात भाजप नेत्यांमध्ये राडा! ‘सारथी’च्या कार्यक्रमात खुर्चीवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार भिडले

Friday, 26 June 2026, 18:25

जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील शिपाई भरतीचा नियम बदलला; आता 12 वी उत्तीर्ण आणि स्थानिक उमेदवारांनाच संधी

Friday, 26 June 2026, 17:42

लोणी काळभोर येथे एकाच दिवसात 227 जणांना मिळाले एसटी प्रवास सवलत कार्ड; ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम, सुभाष आप्पा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी..

Friday, 26 June 2026, 17:01
Next Post

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न; सर्वसमावेशक एकात्मिक शिक्षणाचे दर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.