Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भाजप नेत्यांमध्ये राडा! ‘सारथी’च्या कार्यक्रमात खुर्चीवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार भिडले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 18:25

पुणे: पुण्यातील सारथी संस्थेतर्फे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील आसनव्यवस्थेवरून भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावेळी माधुरी मिसाळ किंवा इतर मंत्री आले नव्हते. त्यामुळे त्या जागा रिकाम्या होत्या. अभिमन्यू पवार यांना पहिल्या रांगेत बसायचं होतं, म्हणून ही धावाधाव सुरू होती.”

त्या पुढे म्हणाल्या, “सारथीच्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्यावं, अशी माझी इच्छा होती. कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार आहेत. मात्र, अभिमन्यू पवार यांना स्वतः पुढे बसायचं होतं.”

 

मेधा कुलकर्णी यांनी आणखी आरोप करत म्हटलं, “हा कार्यक्रम मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सारथी संस्थेचा होता. मी चांगल्या भावनेने कार्यक्रमाला गेले होते. मात्र, माझ्या जातीला चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन गालबोट लावण्याचं काम करण्यात आलं. अभिमन्यू पवारांनी मला हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसू नका, कारण त्यामुळे वाद होईल, असं सांगितलं. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे, एका जातीचा नाही. शासकीय प्रोटोकॉलनुसार आसनव्यवस्था केली जाते, जातीनुसार नाही.”

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी मेधाताईंना एवढंच सांगितलं होतं की, नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू. यात कुठल्याही जातीचा विषय नव्हता.”

पवार पुढे म्हणाले, “हा कार्यक्रम माझ्या घरचा नव्हता. मेधाताई माझ्या वरिष्ठ आहेत आणि माझ्या नेत्या आहेत. माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र कार्यक्रमातून बाहेर पडायचं की थांबायचं, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05
Next Post

‘या हुसेन... या हुसेन’च्या गर्जनांनी दुमदुमले लोणी काळभोर; मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.