Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 June 2026, 18:52

पुणे, ता. २६ : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) भव्य जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. “ड्रग्सला नकार, जीवनाला होकार” हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ही रॅली पार पडली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. मुकुंदराव आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक (कळस), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरएनडीई, विश्रांतवाडी चौक, धानोरी रोड, गोकुळनगर, भैरवनगर, भरत ढाबा, धानोरी जकात नाका, जाणता राजा चौक, गणपती चौक (मुंजाबा वस्ती), टिंगरेनगर, एअरपोर्ट रोड, सावंत पेट्रोल पंप चौक, कॉमरझोन, अग्रसेन शाळा, आरटीओ, सापरस चौक आणि आदर्श इंदिरानगर असा मार्ग पूर्ण करून रॅलीचा समारोप विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आला.

रॅलीमध्ये ५२ दुचाकींसह महिला व पुरुष पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीस मित्र, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुमारे १०० ते १२० जणांनी या जनजागृती अभियानात सहभाग नोंदविला. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले.

 

दरम्यान, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही जनजागृती बाईक रॅली शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23
Next Post

समाजसुधारणेचा विचार आजही प्रेरणादायी - प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.