दौंड, (पुणे) Daund Crime : दौंड शहरात दुचाकीवरील दोन चोरट्यांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने एका स्थापत्य अभियंतावर सुऱ्याने केलेल्या हल्ल्यात सुदैवाने बचावला आहे. (Daund Crime) सौरभ संतोषकुमार भंडारी असे स्थापत्य अभियंताचे नाव आहे. (Daund Crime)
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ भंडारी हे रेल्वे ज्युनिअर इंस्टिट्यूट ते हुतात्मा चौक या रस्त्यावरून शनिवारी (ता. ६) रात्री पायी जात होते. अंधारमय असलेल्या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी सौरभ यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.
मात्र सौरभ याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी एकाने एक फुट लांबीच्या दुधारी सुरा उगारल्याने सौरभ यांच्यावर वार केला. परंतु सौरभ याने तो चुकवला. झटापटीत सौरभ यांनी चोरट्यांची दुचाकी धरून ठेवल्याने चोरट्याच्या हातातील सुरा खाली पडल्यानंतर एक चोरटा रेल्वे डिझेल पॅाइंट दिशेने तर दुसरा हुतात्मा चौकाच्या दिशेने पळाला. झटापटीत सौरभ यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी विना क्रमांकाची दुचाकी व सुरा जप्त केला आहे. सौरभ यांच्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दौंड पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund Crime : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास
Daund Crime : दौंड तालुक्यातील देवकरवाडीतील दोन गुऱ्हाळचालकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल..