बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील श्री कानिफनाथ गडावर २७ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमी निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कानिफनाथ भक्तांनी गोविंदा रे, गोपाळाचा जयघोष केला. कानिफनाथगडावर आज पहाटे देवांना अभिषेक घालण्यात येवुन महापुजा झाली. त्यानंतर 6.30 वा. पहाटेची नाथांची आरती हे कार्यक्रम झाले. सकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडींचे कानिफनाथगडावर स्वागत करण्यांत आले. त्यानंतर दु. 12 वाजताची नाथांची आरती होऊन कानिफनाथ दहिहंडी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रम झाला. बोपगाव येथील भक्तांच्या वतीने भजनाची सुरेल मैफिल संपन्न झाली.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन यावेळी उपाध्यक्ष दिपक फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, संचालक शिवाजी जगदाळे, प्रकाश का. फडतरे, प्रकाशआप्पा फडतरे, सुरेश फडतरे, महादेव फडतरे, नितीन फडतरे, रमेश फडतरे, मंगेश फडतरे, कान्हू फडतरे,व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठे आदी उपस्थित होते.
दुपारी १ वा. मंदिरात आरती झाली. त्यानंतर छबिना निघाला. दु. १:१५ वाजता सर्जेरावनाना जगदाळे यांनी दहिहंडी फोडली. यानंतर ढोल लेझीमच्या तालावर उपस्थित भाविक भक्तांनी जोरदार ठेका धरला. सायंकाळी बोपगाव येथून निघालेली दिंडीं कानिफनाथगडावरच्या दहिहंडी कार्यक्रमानंतर पुन्हा बोपगावला परतली. गावात आल्यानंतर येथे गावातील दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्याची माहिती उपाध्यक्ष दिपक फडतरे यांनी दिली.