पुणे : राज्य सरकारकडून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानुसार आरटीओ विभागाकडून शहरात एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची नागरिकांना सक्ती केली आहे. नागरिकांनी देखील ती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पिंपरी चिंचवड विभागात एका व्यक्तीला एकाच गाडीसाठी दोन नंबर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे महेश आगम यांनी ऑनलाईन नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र त्यांना संबंधित कंपनीकडून एकाच वाहनसाठी दोन नंबर प्लेट आल्या. त्यात पुढीची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे. त्यात MH 14 BN 8927 हा क्रमांक त्यांचा ओरिजनल असून मागे बसवण्यात येणारा क्रमांक हा चुकीचा आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांच्या गाड्यांचे चोरी होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्याच्या आरटीओ विभागाकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची सक्ती नागरिकांना केली जात आहे.नवीन नंबर प्लेट बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला राज्य शासनाकडून देण्यात आले त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करताना नागरिकांकडून संपूर्ण पैसे घेतले जात आहेत. अपॉइंमेंट नुसार नंबर प्लेट बसवून दिल्या जात आहेत.
दरम्यान याबाबत बोलताना आगम म्हणाले की, मला आलेले दोन्ही क्रमांक वेगळे असून संपूर्ण चूक राज्य सरकारची आहे.त्यांनी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यांची ही चूक आहे. ज्यावेळी मी आपइनमेंट नुसार नंबर प्लेट बसावायाला गेलो त्यावेळी हा प्रकार लक्षात आला.