पुणे : जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबार आयोजित करण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंबर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज ०९ मे २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.