Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील दुकानदारावर बनावट माल विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 31 July 2026, 10:43

उरुळी कांचन, (पुणे) : नामांकित आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट डिझाइन व पी.ओ.पी. बॉटम पट्ट्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘श्री गणेश एंटरप्रायझेस’ या दुकानावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 56 हजार 400 रुपये किमतीचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे.

‘सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा लोगो, डिझाइन आणि नावाचा गैरवापर करून बनावट पी.ओ.पी. बॉटम पट्ट्यांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी लालजी मोतीलाल यादव (वय-56, रा. आश्रमरोड, राज हायट्स, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ‘स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रा. लि.’ कंपनीचे फिल्ड एक्झिक्युटिव्ह सरफराज अब्दुल रउफ तांबोळी (वय 43 रा. कसबा पेठ, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेंट गोबेन इंडिया प्रा. लि.’ या मूळ कंपनीने आपल्या ब्रँडच्या बनावट उत्पादनांवर व कॉपीराईट उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी ‘स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क’ या कंपनीला अधिकृत अधिकार दिलेले आहेत. कोरेगाव मूळ येथील चिंतामणी हॉस्पिटलजवळ असलेल्या ‘श्री गणेश एंटरप्रायझेस’ या दुकानात आणि गोदामात सेंट गोबेन कंपनीच्या पेटंट डिझाइन, लोगो आणि ‘झिप फ्रेम एक्सपर्ट’ नावाचा बेकायदेशीर वापर करून तयार केलेल्या बनावट सीलिंग बॉटम पट्ट्यांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवल्याची खात्रीशीर माहिती फिल्ड एक्झिक्युटिव्ह सरफराज तांबोळी यांना मिळाली होती.

 

त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड विभाग) यांच्याकडे छापा कारवाईसाठी अर्ज दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार निलेश जाधव व दोन स्वतंत्र पंचांच्या पथकाने मंगळवारी (ता. 28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ‘श्री गणेश एंटरप्रायझेस’वर छापा टाकला.

छापा टाकला असता त्या ठिकाणी विकास यादव हा तरुण हजर होता. चौकशी केली असता ही आस्थापना त्याचे वडील लालजी मोतीलाल यादव यांच्या मालकीची असल्याचे समजले. गोदामाची पाहणी केली असता, त्यामध्ये सेंट गोबेन कंपनीच्या प्रमाणित डिझाइन आणि ‘झिप फ्रेम एक्सपर्ट’ लोगोची हुबेहूब कॉपी केलेल्या बनावट पी.ओ.पी. बॉटम पट्ट्या आढळल्या.

दरम्यान, पंचांसमक्ष तपासणी करून पोलिसांनी बनावट पी.ओ.पी. बॉटम पट्ट्या असा 56 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासणी अधिकाऱ्यांनी यातील काही नमुने (सॅम्पल्स) फॉरेन्सिक व कायदेशीर पुराव्यासाठी वेगळे सील केले असून उर्वरित सर्व बनावट माल जप्त करून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जमा केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“जमिनीचे कागदपत्रे दे” म्हणत घरात घुसून महिलेला मारहाण! यवत पोलिसांत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Friday, 31 July 2026, 11:38

लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

Friday, 31 July 2026, 11:18

थेऊर फाट्यावर भरधाव ट्रकची मर्सिडीजला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

Friday, 31 July 2026, 10:57

लोणी काळभोरातील उद्योजक हेमंत हाडके आणि संजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल; पेट्रोलपंपावर 11 कर्मचाऱ्यांना पोलीस पडताळणीशिवाय कामावर ठेवणे भोवले

Friday, 31 July 2026, 10:55

वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय! स्थानिक पोलीस ठाण्यात वाहनांची माहिती देणे आता बंधनकारक; अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

Friday, 31 July 2026, 10:49

उरुळी कांचन येथील दुकानदारावर बनावट माल विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 31 July 2026, 10:43
Next Post

वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय! स्थानिक पोलीस ठाण्यात वाहनांची माहिती देणे आता बंधनकारक; अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.