Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 2 October 2026, 12:37

पुणे: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांचा वाढदिवस यंदा कोणत्याही भेटवस्तू किंवा सत्काराऐवजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत तसेच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची जाणीव ठेवत वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

हवेली तालुक्यातील वाघोली, पेरणे, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा एकाच दिवशी १६०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

या आरोग्य शिबिरामध्ये NCD अंतर्गत रक्तदाब, रक्तातील साखर व कॅन्सर तपासणी, आयुष तपासणी, रक्त तपासणी, नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू निदान, ईसीजी, माता व बालक आरोग्य तपासणी तसेच ओपीडी अशा विविध तपासण्यांचा समावेश होता. नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी योग्य सल्लाही देण्यात आला.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मतदारसंघातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, पदाधिकारी आणि नेते यांनी आपल्या परीने आर्थिक मदत जमा केली असून, ही मदत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदीपदादा कंद यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून ही मदत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

यासोबतच मतदारसंघातील नागरिकांना वीज समस्येतून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी सोलर योजनेलाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आमदार माऊली आबा कटके यांच्या वतीने विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवा, शेतकऱ्यांना मदत आणि सौरऊर्जेसारख्या समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत ‘वाढदिवस हा स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस’ हा संदेश आमदार माऊली आबा कटके यांच्या उपक्रमातून देण्यात आला.

“अजितदादा पवार दरवर्षी माझ्या वाढदिवशी आवर्जून शुभेच्छा देत असत. त्यांच्या आठवणींना अभिवादन करत यंदाचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि १६०० हून अधिक नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवा देणे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे. जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत राहणे, हीच माझी भूमिका आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बँकॉकहून पुण्यात आली भारतीय महिला; विमानतळावर संशयित हालचाली अन् बॅगेत ‘हेअर ट्रीटमेंट’ आणि स्क्रबचे डबे; झडती घेताच पोलिसही चक्रावले

Saturday, 3 October 2026, 14:34

दोन वर्षांपासून सेवा सातत्याचा प्रस्ताव प्रलंबित; 75 वर्षीय शिक्षकाची शासनदरबारी धावपळ

Saturday, 3 October 2026, 14:25

पुण्यात मध्यरात्रीची वेळ, सामसूम रस्त्यावरून एकटा जाणारा तरुण; हातात दोन बॅगा आणि पाठीवर सॅक, दुचाकीवरून चौघांनी घेरलं अन् मग…

Saturday, 3 October 2026, 14:22

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकचा ब्रेक फेल; डंपर अन् दुचाकीला जोरदार धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Saturday, 3 October 2026, 14:18

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22
Next Post

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp