Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकॉकहून पुण्यात आली भारतीय महिला; विमानतळावर संशयित हालचाली अन् बॅगेत ‘हेअर ट्रीटमेंट’ आणि स्क्रबचे डबे; झडती घेताच पोलिसही चक्रावले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 14:34

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) पथकाने अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका भारतीय महिलेच्या सामानाची तपासणी करताना कॉस्मेटिकच्या तीन डब्यांमध्ये लपवून आणलेले सुमारे १ कोटी रुपये किमतीचे हशिश जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (IX-241) विमानाने ही महिला बँकॉकहून पुणे विमानतळावर आली होती. विमानतळावर तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) आणि DRIच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिच्या चेक-इन सामानाची तपासणी करण्यात आली.

सामानाच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना कॉस्मेटिकचे तीन डबे आढळून आले. यापैकी दोन डबे ‘राइस अँड योक हेअर ट्रीटमेंट’चे, तर एक डबा ‘बॉडी स्क्रब’चा होता. डबे बाहेरून सामान्य दिसत असले तरी त्यांच्यावर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. डबे उघडल्यानंतर त्यामध्ये मेणासारखा पदार्थ आढळून आला. तसेच त्यातून विशिष्ट वास येत असल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला.

यानंतर नार्कोटिक ड्रग फिल्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून या पदार्थाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हा पदार्थ कॅन्नाबिस एक्सट्रॅक्ट अर्थात हशिश असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत एकूण सुमारे १ किलो २४३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

कस्टम्स आणि DRIच्या पथकाने एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अमली पदार्थ जप्त करून संबंधित महिलेला अटक केली आहे. हा अमली पदार्थ पुण्यात कोणाला देण्यात येणार होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अधिकारी करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! व्यावसायिकाला जाळ्यात ओढून लावला २ दोन कोटींचा चुना

Sunday, 4 October 2026, 16:01

भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून कौस्तुभ गावडेंना उमेदवारी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक वारशाचे वारसदार; कौस्तुभ गावडे नेमके कोण?

Sunday, 4 October 2026, 15:51
Next Post

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला! महायुतीकडून भाजपने मारली बाजी; कौस्तुभ गावडे उमेदवारीच्या रिंगणात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp