Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपकडून विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक वारशाचे वारसदार; कौस्तुभ गावडे नेमके कोण?

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 October 2026, 15:51

पुणे, ता. 4 : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राशी गेल्या अनेक वर्षांपासून जवळून जोडलेले असलेले कौस्तुभ गावडे हे कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर “कौस्तुभ गावडे नेमके कोण?” याची चर्चा शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कौस्तुभ गावडे यांच्या मातोश्री प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात होत्या. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या त्या कन्या होत्या. शुभांगी गावडे यांनी सन २००८ पासून सलग १८ वर्षे संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम शिक्षणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सुमारे ४१० संस्कार केंद्रांमध्ये विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात शुभांगी गावडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. संस्थेच्या विविध शाखांमध्ये नवनवीन शैक्षणिक योजना आणि उपक्रम राबवून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आपली स्वतंत्र छाप निर्माण केली. याच शैक्षणिक वातावरणात कौस्तुभ गावडे यांची जडणघडण झाली.

शिक्षण क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव

कौस्तुभ गावडे हे सन २०१९ ते २०२१ या कालावधीत न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सन २०२१ पासून ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षण संस्थेचे प्रशासन, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक तसेच शैक्षणिक प्रशासन यांच्यासोबत काम करण्याचा त्यांना सातत्याने अनुभव मिळाला आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हे केवळ राजकीय मुद्दे नसून आपल्या प्रत्यक्ष कार्याचा आणि अनुभवाचा विषय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व्यापक व्यासपीठ उभारण्याचा निर्धार

पुणे शिक्षक मतदारसंघातील विविध शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षण संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. विचार वेगवेगळे असले तरी शिक्षकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे हीच खरी ताकद असल्याची त्यांची भूमिका आहे. शिक्षकांच्या सर्व संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करणे आणि ते प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यापक व सर्वसमावेशक शिक्षक व्यासपीठ उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

 

‘शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा आधारस्तंभ’

शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून समाजाच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रमुख आधारस्तंभ आहे, अशी कौस्तुभ गावडे यांची भूमिका आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, बंधुभाव, सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार म्हणून शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असून, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो मार्गदर्शक असल्याचे ते मानतात. याच विचारातून शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कौशल्याधारित आणि डिजिटल शिक्षणावर भर

सध्याच्या काळात शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षक प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा या बाबींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षक प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. या बदलत्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व आवश्यक असल्याचे कौस्तुभ गावडे यांचे मत आहे. त्यामुळे शिक्षकांचा आवाज शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक वारसा, आई शुभांगी गावडे यांचा संस्थात्मक अनुभव आणि स्वतःचा शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव या त्रिसूत्रीच्या जोरावर कौस्तुभ गावडे आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने दिलेल्या या उमेदवारीकडे शिक्षण क्षेत्रातील नव्या पिढीच्या नेतृत्वाची संधी म्हणून पाहिले जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03
Next Post

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! व्यावसायिकाला जाळ्यात ओढून लावला २ दोन कोटींचा चुना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp