Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 2 October 2026, 12:26

थेऊर, ता. 02 : प्लॉटिंग व बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक सचिन लोणकर यांच्यावर जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी लोणकर यांच्या अलिशान फॉर्च्युनर गाडीची तोडफोड करत लोणकर यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम सोन्याची साखळी, 50 हजार रुपयांची रोकड आणि महागडे घड्याळ जबरीने काढून घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलवडी (ता. हवेली) हद्दीतील माळवाडी परिसरात बुधवारी (ता. 30) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमरास ही घटना घडली.

याप्रकरणी गजानन गुलाब गायकवाड (वय -35) आणि आकाश कैलास अडसुळे (वय -30, दोघेही रा. कोलवडी) यांच्याविरोधात सचिन ज्ञानेश्वर लोणकर (वय-36) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर हे चिंतामणी इंटरप्रायजेस या नावाने प्लॉटिंग खरेदी-विक्री आणि बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय करतात. यापूर्वी ते गजानन गायकवाड याच्यासोबत लक्ष्मी डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. मात्र, चार वर्षांपूर्वी हा व्यवसाय बंद झाला होता. त्यानंतर कोणताही व्यवहार शिल्लक नसताना गायकवाड हा त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप लोणकर यांनी केला आहे. यापूर्वीही गायकवाड याने पिस्तूल असल्याची धमकी दिल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.

बुधवारी दुपारी लोणकर हे माळवाडी येथील कार्यालयातून वाघोलीकडे जाण्यासाठी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीजवळ आले असता, गायकवाड आणि अडसुळे यांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्या पाठीत, छातीवर, उजव्या पायावर, हातावर आणि बरगड्यांवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

 

या झटापटीदरम्यान लोणकर यांच्या हातातील फॉसिल कंपनीचे घड्याळ, गळ्यातील सुमारे 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि खिशातील 50 हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दोघांनी कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या चारही बाजूंच्या काचा फोडून बोनेटचे नुकसान केले आणि पांढऱ्या रंगाच्या ऑरा गाडीतून घटनास्थळावरून पलायन केल्याचे लोणकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, जखमी लोणकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28
Next Post

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp