Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 October 2026, 12:45

पुणे : पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी प्लॉट देण्याचे आमिष दाखवून उद्योजक राणा सूर्यवंशी याने महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीचीही कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याची चर्चा आता पुणे जिल्ह्यात रंगू लागली आहे. बारामतीतील हल्ला प्रकरण, आरोपींच्या कथित जबाबांबाबत सुरू असलेल्या चर्चा, पोलीस संरक्षण आणि आर्थिक व्यवहारांमुळे राणा सूर्यवंशी प्रकरणाभोवती प्रश्नांचे काहूर उठले आहे. एकीकडे हल्ला प्रकरणाचा तपास सुरू असताना, दुसरीकडे कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार का आणि पोलीस प्रशासन या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

बारामतीतील हल्ला प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ वासुदेव अवथळे (वय 19) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय 50) यांच्यासह अन्य व्यक्तींच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे यांच्या कथित सहभागाबाबतही दावे केले जात आहेत. मात्र, या प्रकरणातील नेमका घटनाक्रम, कटामागील सूत्रधार आणि आरोपींच्या जबाबांतून समोर आलेली माहिती याबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

या हल्ल्यामागे राणा सूर्यवंशी याचाच हात असल्याची चर्चा काही वर्तुळांत होत असली, तरी या दाव्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक दाव्याची पुराव्यांच्या आधारे पडताळणी करणे आवश्यक आहे. पोलिसांनी तपास गोपनीय ठेवला असला, तरी तपासाच्या मर्यादेत राहून जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारीही प्रशासनाची आहे.

सर्वसामान्यांना एक न्याय आणि प्रभावशाली व्यक्तींना दुसरा?

राणा सूर्यवंशी याच्याशी संबंधित प्रकरणात काही गंभीर आरोप आणि दावे समोर येत असताना, त्यांची निष्पक्ष चौकशी होत आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाविरोधात खोटी फिर्याद दिल्याचा आरोप झाल्यास पोलिसांची भूमिका काय असते आणि प्रभावशाली व्यक्तींच्या बाबतीतही तेच निकष लागू होतात का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राणा याने खोटी फिर्याद दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास, तसेच शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे पुरावे मिळाल्यास, संबंधित कायद्यांनुसार कारवाई होणार का? केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नसले, तरी आरोपांची चौकशी न करता त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे हल्ला प्रकरणातील सर्व बाजूंची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

पोलीस संरक्षणाचा निर्णय नेमका कसा झाला?

राणा सूर्यवंशी याला पोलीस संरक्षण कोणत्या निकषांवर देण्यात आले, हा मुद्दाही चर्चेत आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या संरक्षणासंदर्भातील निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या आदेशाची अधिकृत पुष्टी आणि चौकशीची सद्यस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. पोलीस संरक्षण देताना संबंधित व्यक्तीला असलेला धोका, उपलब्ध माहिती आणि लागू असलेले नियम विचारात घेतले जातात. त्यामुळे या प्रकरणात संरक्षण देण्यामागील कारणे काय होती, निर्णयप्रक्रियेत कोण सहभागी होते आणि निर्धारित निकषांचे पालन झाले का, याची पारदर्शक तपासणी झाली पाहिजे. चौकशीत कोणतीही अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा, प्रभावशाली व्यक्तींना विशेष वागणूक मिळते का, अशी शंका नागरिकांच्या मनात कायम राहू शकते.

कोट्यवधींच्या व्यवहारांचे धागेदोरे तपासणार कोण?

राणा सूर्यवंशी याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असल्याचा दावा करून पुणे, सोलापूर आणि अन्य जिल्ह्यांतील व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचे आरोपही चर्चेत आहेत. काही रक्कम रुग्णालये आणि कंपन्यांमध्ये गुंतविल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, या व्यवहारांबाबत अधिकृत तक्रारी, आर्थिक कागदपत्रे आणि तपासाची स्थिती याविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर, काही वर्षांपूर्वी पुण्यात चांगल्या ठिकाणी प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा पुन्हा पुढे येत आहे. या कथित व्यवहारामागील सत्य काय, संबंधितांनी तक्रार दाखल केली होती का आणि व्यवहारासंबंधी कागदपत्रे उपलब्ध आहेत का, याची उत्तरे मिळणे महत्त्वाचे आहे. संबंधितांकडून तक्रार किंवा ठोस पुरावे उपलब्ध झाल्यास आर्थिक व्यवहारांची कायदेशीर चौकशी होणे आवश्यक आहे. अन्यथा, कोट्यवधींच्या कथित व्यवहारांबाबतच्या चर्चा केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

रामदास झोळ प्रकरणातील कथित फोन संभाषणामुळे वाद
दत्तकलेचे अध्यक्ष रामदास झोळ आणि नवनाथ झोळ यांच्याशी संबंधित प्रकरणात मध्यस्थी केल्याच्या संदर्भातून राणा सूर्यवंशी याने सचिन भोईटे याला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या कथित संभाषणात, “रेकॉर्डिंग करायची असेल तर करून ठेव. नवनाथला सांग, मंत्र्याकडे जा नाहीतर कोणाकडेही जा,” अशा शब्दांत राणा बोलल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय, संबंधितांना उद्देशून धमकीवजा इशारा आणि शिवीगाळ केली आहे.

या संभाषणाची संपूर्ण ध्वनिमुद्रिका, तिची सत्यता, संदर्भ आणि त्यातील वक्तव्यांचे स्वरूप तपासणे आवश्यक आहे. संभाषणाच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याची स्वतंत्र पडताळणी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाईसाठी आवश्यक पुरावे आढळल्यास पोलिसांनी नियमानुसार पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, राणा सूर्यवंशी याच्या हल्ला प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झोळ यांच्या नातेवाइकांकडून केला जात असल्याचे सांगितले जाते. या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करूनच सत्य समोर येऊ शकते.

पोलिसांनी मौन सोडून वस्तुस्थिती स्पष्ट करावी!

हल्ला प्रकरण, कथित आर्थिक फसवणूक, फोनवरील संभाषण आणि पोलीस संरक्षणाचा मुद्दा अशा अनेक बाबींमुळे राणा सूर्यवंशी प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. मात्र, या सर्व प्रकरणांतील आरोप आणि दावे यांची सत्यता अधिकृत तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित तक्रारींची स्थिती काय, आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे का, पोलीस संरक्षणाबाबत कोणता निर्णय घेण्यात आला आणि हल्ला प्रकरणातील तपास कुठपर्यंत पोहोचला, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.

कायद्यापुढे सर्व समान असतील, तर तपासातही समान निकष लागू झाले पाहिजेत. आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई आणि आरोप निराधार ठरल्यास त्याबाबत स्पष्टता, हीच निष्पक्ष तपासाची खरी कसोटी आहे. केवळ चर्चांवर विसंबून न राहता पुराव्यांच्या आधारे सत्य समोर आणणे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. राणा सूर्यवंशी प्रकरणातील हल्ल्याचे नेमके सत्य काय? प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीच्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार का? पोलीस संरक्षणाच्या निर्णयामागील वस्तुस्थिती काय? आणि या सर्व प्रश्नांवर पोलीस प्रशासन अधिकृत माहिती कधी देणार? या प्रश्नांची उत्तरे आता जनतेला अपेक्षित आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29
Next Post

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp