उरुळी कांचन, (पुणे): पुणे -सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शेजारी शेजारी असलेल्या दोन घरी चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ हद्दीत गुरुवारी (ता. 26) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आशिष अनिल लोंढे, व सौरभ अविनाश गायकवाड (रा. दोघेही, पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) असे घरी चोरी झालेल्या घरमालकांची नावे आहेत. या घटनेत आशिष लोंढे यांच्या घरातून 10 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे तर सौरभ गायकवाड यांच्या घरात चोरट्यांना काहीच मिळाले नाही.

दरम्यान, याबाबत उरुळी कांचन पोलिसांना अदयाप माहिती देण्यात आलेली नाही. अशी महिती मिळाली आहे.







