अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : तालुका शिरूर मधील निमगाव म्हाळुंगी येथे गावठी पिस्टल शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून २ गावठी पिस्टल (रिव्हॉल्वर) व २ जिवंत काडतुस असा १ लाख एक हजाराचा ऐवज जप्त केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ओंकार कृष्णराज आदक, (वय १९ वर्षे, रा. होमाचीवाडी, टाकळी भिमा, ता. शिरूर, जि. पुणे), चेतन सुनिल शिंदे (वय २१ वर्षे, रा निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे) शरद देवीदास माने (वय २१ वर्षे, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की निमगाव म्हाळुंगी येथील खुनातील आरोपी चेतन शिंदे व त्याच्या दोन साथीदाराकडे गावठी पिस्टल आहेत. याची खातरजमा करून पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे शोध पथकाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, अमोल दांडगे, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, प्रतिक जगताप यांनी माहिती प्रमाणे निमगाव म्हाळुंगी येथे चेतन शिंदेच्या घराजवळून आरोपी असलेल्या ठिकाणीं छापा टाकला यात ओंकार आदक, चेतन शिंदे, शरद माने यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल (रिव्हॉल्वर) व २ जिवंत काडतुस असा १लाख एक हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रोहीदास दौलत पारखे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करीत आहेत.